Prabhakar Sail Death Case | कार्डिलिया क्रुझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईलचा मृत्यु; गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prabhakar Sail Death Case | कार्डिलिया क्रुझ पार्टी प्रकरणावेळी (Cordelia Cruise Drugs Case) अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आली होती. एनसीबीच्या (NCB) या कारवाईमध्ये आरोप – प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले होते. त्यावेळी या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा करणारा पंच प्रभाकर साईलचा मृत्यु (Prabhakar Sail Death Case) झाला आहे.

 

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंत प्रभाकर साईल याच्या मृत्युची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी दिली आहे. प्रभाकर साईलच्या मृत्युमुळे (Prabhakar Sail Death Case) संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याच्या मृत्युच्या चौकशीचे (Police Inquiry) आदेश देण्यात आल्याचं वळसे – पाटील म्हणाले.

 

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता.
या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोप केले होते.
त्याचवेळी प्रभाकर साईल याने पुढे येत अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
प्रभाकर साईलचा मृत्यु हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीने सीआयडी (CID) तपासाची मागणी केली आहे.

दरम्यान, एनसीबीने केलेला फर्जीवाडा उघड करणाऱ्या प्रभाकर साईलच्या मृत्युमागे घातपाताची शक्यता आहे.
राज्य सरकारने याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.
पोलीस चौकशीमध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Prabhakar Sail Death Case | aryan khan drugs case maharashtra home minister dilip walse patil give investigation order for prabhakar sail death

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा