Prabhakar Sail Post Mortem Report | आर्यन खान ड्रग्ज केसमधील पंच प्रभाकर साईलचा मृत्यु घातपातामुळे की कशामुळे…?; पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला समोर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Prabhakar Sail Post Mortem Report | देशभर गाजलेल्या आर्यन खान केस प्रकरणामधील (Aryan Khan Drugs Case) प्रमुख साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलचा मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रभाकर साईलने (Prabhakar Sail Death Case) अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यावेळी त्याने पोलीस संरक्षणाची (Police Protection) मागणी देखील केली होती. त्याचा अचनाक मृत्यु झाल्याने हा मृत्यु अनेकांनी संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. अशातच त्याचे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट (Prabhakar Sail Post Mortem Report) समोर आला आहे. (Witness In Cordelia Cruise Drug Case)

 

चेंबुरच्या (Chembur) माहुल परिसरात असणाऱ्या प्रभाकरला त्याच्या घरी त्याला त्रास जाणवू लागला होता.
त्यानंतर साईल स्वत: दवाखान्यात गेला आणि ईसीजी काढला त्यावेळी डॉक्टरांनी त्याला ॲडमिट (Admit) होण्याचा सल्ला दिला आणि ॲडमिट झाल्यावर पाच मिनिटाच्या आत अटॅक आला त्यामध्येच त्याचा मृत्यु (Prabhakar Sail Post Mortem Report) झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

प्रभाकर साईलचं राजावाडी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून त्यामध्ये त्याचा मृत्यु हा घातपाताने नाहीतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Prabhakar Sail heart Attack) झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रभाकरच्या मृत्युबाबत पोलीस चौकशीचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिले आहेत.

कोण होता प्रभाकर साईल ?
कार्डिलिया क्रुझ पार्टी प्रकरणावेळी (Cordelia Cruise Drugs Case) अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan)
मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करण्यात आली होती.
त्यावेळी एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता.
या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोप केले होते.
त्याचवेळी प्रभाकर साईल याने पुढे येत अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Prabhakar Sail Post Mortem Report | cordelia cruise aryan khan drug case witness prabhakar sail death cause he died of heart attack

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा