परभणी : अश्लील शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा, स्थानिक शिवसेना नेत्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी शहरापासून जवळच असलेल्या माजलगाव महामार्गावरील धाबा चालू असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पोहोचलेल्या पोलीस पथकास अश्लील शिवीगाळ व अंगावर धावून गेल्याने आरोपींविरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की माजलगाव महामार्गावरील धनश्री धाबा चालू असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पत्त्याचा बेकायदेशीर जुगार खेळवल्या जात आहे. या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व इतर कर्मचारी धनश्री धाब्यावर पोहोचले. त्या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी मुंजा कोल्हे, गोपाळ साखरे, ( पुष्कर ) कंसातील एक आरोपीचे नाव कळू शकले नाही.

कायद्या कामी पोहोचलेल्या पोलिसांना त्यांनी मज्जाव केला. तसेच धाबा चालू असल्याचा दिसून आला यातील आरोपींतानी अश्लील शिवीगाळ करून अंगावर धावून गेले. हि घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शिवीगाळ शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून आरोपींविरुद्ध दिनांक 27 जून पहाटे पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांनी फिर्याद दिली. फिर्यादीवरून शनिवारी गुन्हा नोंद झाला. पोलीस उपनिरीक्षक कोरके यांना शिवसेना पदाधिकारी मुंजा कोल्हे यांनी शिवीगाळ केली.

आरोपींविरुद्ध 188,353,332,269,270,294,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. मुंजा कोल्हे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक यांनी दिली पुढील तपास पाथरी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड हे करीत आहेत.