Advt.

Adipurush Release Date : समोर आली प्रभास आणि सैफच्या ‘आदिपुरुष’ची रिलीज डेट !

पोलिसनामा ऑनलाइन – बाहुबली (Baahubali) फेम प्रभास (Prabhas) गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. आता सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. तान्हाजी द अनसंग वॉरियरचे (Tanhaji : The Unsung Warrior) डायरेक्टर ओम राऊत (Om Raut) यांनी आगामी आदिपुरुष सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. सोशलवर सिनेमाच्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.

ओम राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सांगितलं होतं की, 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

प्रभास या सिनेमात आदिपुरुष हा लिड रोल साकारत आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार या सिनेमाचं बजेट 350 ते 400 कोटी एवढं आहे. सिनेमासी संबंधित लोकांना असं वाटत आहे की, हा सिनेमाही बाहुबली सिनेमाप्रमाणे इतिहास रचेल. चाहतेही या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहेत.

या सिनेमात सीतेचा रोल कोण साकारणार आहे यावरून अनेकजण उत्सुक आहेत. आतापर्यंत सीतेच्या रोलसाठी अनेक नावं समोर आली आहेत. या यादीत कियारा अडवाणी (Kiara Advani), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), कृती सेनन (Kriti Sanon), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) अशा अनेक नावांचा समावेश आहे. परंतु कोण ही भूमिका साकरणार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

या थ्रीडी अ‍ॅक्शन सिनेमाची शूटिंग 2021 मध्ये सुरू होणार आहे. हा सिनेमा हिंदी आणि तेलगूत शूट केला जाणार आहे, तर तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केला जाणार आहे.