साहो : थिएटरवर बॅनर लावताना ‘बाहुबली’ प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली स्टार प्रभासच्या आगामी साहो सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेज आहे. खासकरून साऊथ मध्ये 30 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या साहोच्या तयारीत प्रत्येक गल्ली-बोळ सिनेमाच्या बॅनर आणि पोस्टर्सने सजवली आहे. या सिनेमाच्या बॅनरला थिएटरवर लावताना प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?
लोकल रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या चाहत्याचा मृत्यू करंट लागल्याने झाला आहे. तेलंगणास्थित महबूबनगरचा रहिवासी प्रभासचा फॅन लोकल थिएटरवर साहोचा बॅनर आणि पोस्टर्स लावत होता. यावेळी थिएटर बिल्डिंगवरून बोर्डावर बॅनर लावण्याच्या दरम्यान एका इलेक्ट्रीक वायरच्या संपर्कात येऊन करंट लागल्याने तो बिल्डिंगवरून खाली पडला आणि यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यात तो चाहता मरण पावला.

या घटनेनंतर थिएटरच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. सध्या तरी प्रभासला आपल्या चाहत्याच्या मृत्यूची कल्पना नाही. प्रभासला घेऊन चाहत्यांमध्ये कमलीचा उत्साह दिसत आहे. काही चाहत्यांनी प्रभासचं होमटाऊन हैद्राबादमध्ये त्याचं 200 फूट उंच बॅनरही लावलं आहे.

सुजीत दिग्दर्शित साहो या अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर लिड रोलमध्ये आहे. हा सिनेमा वामसी कृष्ण रेड्डी, प्रमोद उप्पलपती आणि भूषण कुमार यांनी प्रोड्युस केला आहे. या सिनेमासाठी 350 कोटी खर्च करण्यात आले आहेत. देशभरात या सिनेमाला 10 हजार स्क्रिन्स मिळाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Byo6RUlHfEv/

 

आरोग्यविषयक वृत्त –