..म्हणून प्रदर्शनाआधीच ‘साहो’नं उडवली प्रभासची झोप !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली सिनेमा केल्यानंतर अभिनेता प्रभास फक्त भारतातच नाही तर परदेशातही फेमस झाला. राजामौलींच्या या सिनेमानंतर प्रभासचे जगभरात चाहते झाले. बाहुबलीनंतर अनेक निर्मात्यांच्या रांगा लागूनही प्रभासने साहो या सिनेमाची निवड केली. काही दिवसांपूर्वी साहोचा ट्रेलरही लाँच झाला होता. परंतु प्रभास सध्या काहीसा घाबरलेला आहे. या सिनेमानं त्याची झोप उडवली आहे असे खुद्द प्रभासनेच सांगितले आहे.

एका मुलाखतीत याबाबत बोलताना प्रभास म्हणाला की, “एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली सिनेमा कधीच विसरू शकत नाही. साहो सिनेमा माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूपच स्ट्रेसफुल होता. हा ताणाव त्या सिनेमाच्या स्क्रिप्ट किंवा दिग्दर्शकामुळे नाही तर राजामौलींनी दिलेल्या तणावामुळे हा सिनेमा माझ्यासाठी मानसिक पातळीवर तणावपूर्ण होता.”

पुढे बोलताना प्रभास म्हणाला की, “मला चाहत्यांचं एवढं प्रेम मिळत आहे. मला माहिती देखील नव्हतं की, लोक मला सर्वाधिक पसंत करतात. माझ्या एका मित्राने मला सांगितलं की, कशाप्रकारे गुजरातमध्येही लहान मुलं बाहुबलीची गाणी गाताना दिसतात. यामळे चाहत्यांच्या प्रेमाचा आणि अपेक्षांचा माझ्यावर खूप प्रेशर होता जे खूप भीतीदायक आहे. साहोमुळे मी अनेक रात्री न झोपताच काढल्या आहेत. याच तणावामुळे माझी झोप उडाली होती.”

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like