Prabhas | ‘राधेश्याम’ चित्रपटाचं नवीन पोस्टर झालं रिलीज, ‘प्रभास’च्या वाढदिवसादिवशी होणार ट्रेलर रिलीज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) बाहुबली नंतर चाहत्यांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. ‘राधेश्याम’ (radheshyam) चित्रपटामध्ये प्रभास विक्रमादित्यच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) वाढदिवसा दिवशी पोस्टर रिलीज झाला होता त्या नंतर प्रभासच्या (Prabhas) वाढदिवसाच्या आधी 3 दिवस पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

 

सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या ‘राधेश्याम’ चे पोस्टर बघून मना मध्ये असा प्रश्न येतो की ‘विक्रमादित्य’ कोण आहे ? पोस्टर मध्ये प्रभास ठळक पणे दिसून येत आहे, प्रभास कोणत्यातरी विचारात मग्न असल्याचे दिसत आहे, पोस्टर मधील प्रभासची भूमिका चिंताजनक दिसत आहे. चाहत्यांकडून कमेंट्स मध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली जात आहे. चाहत्यांकडून प्रभासला (Prabhas) भरभरून प्रेम भेटत आहे.

 

विक्रमादित्याचा स्पेशल कॅरेक्टरचे 23 ऑक्टोम्बरला ट्रेलर प्रभासच्या जन्मदिनादिवशी रिलीज होण्यासाठी तयार आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये टीजर रिलीज होणार आहे परंतु डायलॉग इंग्लिश मधेच दिसून येणार आहेत. पूजा (Pooja Hegde) आणि प्रभास (Prabhas) या चित्रपटामध्ये एकत्र दिसून येणार आहेत. चाहत्यांना चित्रपट येण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Web Title :- Prabhas | new poster of prabhas from the film radheshyam marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | WhatsApp च्या ‘स्टेटस’वर ‘गुड बाय’ लिहून हिंगोलीच्या उच्चशिक्षीत तरूणाची औरंगाबादमध्ये आत्महत्या

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,879 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | …म्हणून पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेल्यांना जातपडताळणी कार्यालयात प्रस्तावांच्या प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन