Prabhas | प्रभासने चित्रपटच्या Fees बाबतीत ‘सलमान -अक्षय’ ला देखील सोडलं मागे!

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Prabhas | एखाद्या चित्रपटाला सुपरहिट करण्यामागे बरीच कारणं असतात. एखादा फॅन त्याच्या आवडीचा हिरो असेल तर तो चित्रपट कितीही वेळा पाहतो. परंतु हे चित्रपटाचे नायक त्या चित्रपटासाठी किती पैसे घेतात याचा आपल्याला अंदाजा ही नसेल. बॉलीवूड मध्ये ‘बाहुबली’ (Bahubali) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासने (Prabhas) त्याच्या आगामी सिनेमा ‘आदिपुरुष’साठी (adipurush) चक्क सलमान खानला (Salman Khan) देखील मागे सोडले आहे.

 

प्रभास ‘आदि पुरुष’मध्ये रामाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत तर सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

 

आतापर्यंत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये सलमान खान आणि अक्षय कुमार (akshay kumar) यांचे नाव होते.
प्रभासने त्याच्या आगामी चित्रपटाच्या फीज बाबतीत अक्षय-सलमानला खूप मागे टाकले आहे.
प्रभास ने त्याचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ साठी तब्बल 150 कोटींची तगडी फी घेतली आहे.
प्रभासने (Prabhas) या चित्रपटात भरघोस फी घेऊन सलमान खान आणि अक्षय कुमारला मागे टाकले आहे.
त्याने थेट 100 कोटींपेक्षा 50% जास्त फी घेऊन दोघांनाही मागे टाकले आहे. यानंतर तो भारतीय मनोरंजन जगतातील तिसरा महागडा अभिनेता म्हणून उदयास आला आहे.
सलमान खानने ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’साठी 100 कोटींहून अधिक फी घेतली होती.
त्याचप्रमाणे अक्षय कुमारनेही ‘बेल बॉटम’साठी 100 कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Web Title : Prabhas | prabhas fees breaches the 100 crore mark making him the next century holder after salman khan akshay kumar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur News | कोल्हापूर जिल्ह्यात जादा व्याजाच्या आमिषाने कोट्यवधीची गुंतवणूक

ICC T20 Rankings | बाबर आझम अव्वल स्थानी तर कोहली टॉप 10 मधून OUT

Maharashtra Health Department | सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘या’ उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा होणार