प्रभासच्या चाहत्यांसाठी ‘ही’ आहे खुशखबर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचा अभिनेता प्रभास आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. प्रभासचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बाब अशी की, प्रभास लवकरच इन्स्टाग्राम या फोटो शेअरींग अ‍ॅपवर पदार्पण करणार आहे. प्रभासचे फेसबुकवर अकाऊंट असून तो फेसबुकवर सक्रिय असतो. आता प्रभास इन्स्टाग्रामवरही सक्रिय असल्याचं दिसणार आहे. इन्स्टाग्रामवरून प्रभास आता चाहत्यांशी कनेक्ट राहणार आहे.

सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात, मग ते त्यांचे खासगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य असो. सोशल मीडियामुळे लोक आणखी जवळ आले आहेत. सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील अंतरही कमी झाले आहे. कदाचित हाच विचार करून प्रभास इन्स्टाग्रामवर पदार्पण करत आहे.

दरम्यान प्रभासचा आगामी चित्रपट साहो हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही देखील झळकणार असून त्यात तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. याशिवाय यात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे आदी दिग्गज कलाकारही मु्ख्य भूमिकेत दिसणार आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.

साहो या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधील 50 लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली आहे. ही टीम प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण देणार आहे. या 50 लोकांनी आजवर अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. आता ही टीम प्रभासच्या साहोसाठी काम करणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like