‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा, Saaho नंतर धरला ‘या’ डायरेक्टरचा ‘हात’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –साऊथ सुपरस्टार बाहुबली फेम प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. प्रभासनं आपला आगामी सिनेमा साईन केला आहे. याची अधिकृत माहिती समोर आली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून मेकर्सनं प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. प्रभासला लिड स्टार सांगत ही एक एपिक जर्नी होणार असल्यां म्हटलं आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्शनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यानं व्हिडीओ शेअर केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभासचा हा आगामी सिनेमा डायरेक्टर नाग अश्विन डायरेक्ट करणार आहेत. तर वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली हा सिनेमात तयार केला जाणार आहे. वैजयंती मुव्हीजला इंडस्ट्रीत 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्तानंच या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हे व्हिडीओ पाहून प्रभासच्या चाहत्यांना आनंद होणार आहे हे मात्र नक्की.

नाग अश्विन यांचा याआधीचा महानती या सिनेमानं धुमाकूळ घातला होता. कीर्ति सुरेश स्टारर हा सिनेमा चाहत्यांना तर आवडलाच होता पंरतु क्रिटीक्सकडूनही या सिनेमाचं कौतुक झालं होतं. भारतीय अदाकार सावित्रीचा हा बायोपिक होता. त्यामुळे आता नाग अश्विन प्रभासचा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत पाहून हे पाहून सर्वांचं लक्ष या सिनेमावर लागलेलं आहे.

You might also like