हॉलिवूड सिंगर बियॉन्सेच्या तालावर थिरकणार ‘बाहुबली’ प्रभास

मुंबई :वृत्तसंस्था- बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ च्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे त्याच्या ‘साहो’  चित्रपटाची.  या चित्रपटा संबंधी एक बातमी समोर आली आहे. ‘साहो’ चित्रपटात हॉलिवूड सिंगर बियॉन्से च्या गाण्यावर प्रभास थिरकणार असल्याचे कळले आहे. जगात लोकप्रीय असलेल्या बियॉन्सेच्या सुपरहिट गाणी चित्रपटात असणार आहे. या सुपरहिट गाण्यांवर प्रभास थिरकताना दिसणार आहे.

pjimage
एका वृत्तानुसार,‘साहो’च्या एका गाण्याचे चित्रीकरण लवकरच होणार आहे. यासाठी एक भव्य सेट साकारला जातोय. हा डान्स नंबर कार्निव्हल थीमवर आधारित असेल. साहजिकचं यासाठी ब्राझिलचे स्पेशल डान्सर्स बोलवण्यात आले आहे. वैभवी मर्चंट या गाण्याची कोरिओग्राफी करणार आहे. बियॉन्सेच्या ‘ब्लो’ आणि ‘जेलेस’ ही गाणी या डान्स ट्रॅकचा भाग असतील. एकंदर काय तर प्रभास आणि बियॉन्सेच्या चाहत्यांना एक धम्माल ट्रिट मिळणार.

‘साहो’चित्रपटात  प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारतांना दिसणार आहे. तसेच ती अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

प्रभासचे  ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अगदी रेकॉर्डब्रेक कमाई केली.या चित्रपटामुळे प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यामुळेरिलीज झाल्यावर ‘साहो’ चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.