विवाहबद्ध होणार प्रभू देवा ! भाची नव्हे तर हिच्यासोबत करणार लग्न, जाणून घ्या कधी

पोलीसनामा ऑनलाइन – डायरेक्टर, प्रोड्युसर आणि अ‍ॅक्टर प्रभू देवा (Prabhu Deva) गेल्या अनेक दिवसांपासून खासगी लाईफमुळं चर्चेत येतान दिसत आहे. तो पुन्हा एका लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे असं गेल्या अनेक दिवसांपासून सांगितलं जात आहे. प्रभू देवा आपल्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे असं सांगत दोघं लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. प्रभू देवा लग्न करणार असल्याचं एका इंग्रजी वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. परंतु त्याची वधू ही त्याची भाची नसणार आहे.

प्रभू देवा भाची सोबत लग्न करण्याच्या अफवा आहेत. तो मुंबईतील एका फिजिओथेरपिस्टसोबत लग्न करणार आहे असं सांगितलं जात आहे. खास बात अशी की, सप्टेंबरमध्येच ही जोडी विवाहबद्द होणार आहे.

कसं जुळलं सूत ?

प्रभू देवा आपल्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे असं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. परंतु या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभू देवा पाठीला दुखापत झाल्यामुळं या फिजिओथेरपिस्ट उपचार घेत होता. याच काळात या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

1995 मध्ये केलं होतं पहिलं लग्न

प्रभू देवानं 1995 साली रामलत (Ramlath) सोबत पहिलं लग्न केलं होतं. रामलत इस्लाम धर्मीय होती. लग्नानंतर तिनं हिंदू धर्म स्वीकारला होता आणि तिनं तिचं नाव बदलून लता ठेवलं होतं.

प्रभू आणि लता यांना 3 मुलं आहेत. 2008 साली मोठा मुलगा विशाल याचं कॅन्सरमुळं निधन झालं होतं. नयनतारामुळं त्यांच्या नात्यात दरी आली आणि 2011 साली त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी लताला मिळाली. परंतु प्रभूला त्याच्या मुलांना भेटण्याचं स्वातंत्र्य आहे.

प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सलमान खानचा सिनेमा राधे डायरेक्ट करत आहे. याशिवाय तो तमिळ सिनेमा पोन मनिकावेल, युंग मुंग सुंग आणि बघीरा अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे.

You might also like