Coronavirus : Practo नं ‘कोरोना’ टेस्टसाठी सुरू केली ऑनलाइन बुकिंग सेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बंगळुरूची कंपनी प्रेक्टोने कोरोना इन्फेक्शन टेस्टची ऑनलाईन बुकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी कंपनीने थायरोकेअर बरोबर भागीदारी केली आहे. आता लोक ऑनलाइन चाचणीसाठी सहज बुक करू शकतील. तसेच कंपनीच्या या हालचालीमुळे कोविड – 19 ला रोखण्यात मदत होईल. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे देशात 32 लोकांचा मृत्यू झाला असून 1251 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे तर 100 लोक बरे झाले आहेत.

कंपनीच्या ब्लॉग पोस्टवर मिळाली माहिती
प्रॅक्टोच्या अधिकृत ब्लॉगनुसार कंपनी थायरोकेयरच्या सहकार्याने व्हायरसची तपासणी करीत आहे. त्याच वेळी, कोरोना चाचणीसाठी, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, फिजिशियन चाचणी ओळख फॉर्म आणि प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना चाचणीचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी लोकांना कंपनीच्या अधिकृत साइटवर किंवा थायरोकेअरवर जावे लागते. तसेच, त्यांना या चाचणीसाठी 4,500 रुपये द्यावे लागतील. सध्या ऑनलाइन बुकिंग सेवा फक्त मुंबईतच उपलब्ध आहे. अशी अपेक्षा आहे की लवकरच ही सेवा देशातील इतर शहरांमध्ये सुरू केली जाईल.

लोकांच्या घरी जाऊन घेतले जातील रक्ताचे नमुने
कंपनीचे म्हणणे आहे की, रक्ताचे नमुने लोकांच्या घरी जाऊन घेतले जातील. यावेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नियमांचीही दखल घेतली जाईल. त्याच वेळी, कोरोना चाचणीचा अहवाल दोन दिवसात कंपनीच्या अधिकृत साइटवर सापडेल.