मी किती एन्काउंटर केले माहित नाही, येणारे आकडे मीडियातले : प्रदीप शर्मा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी 1990 च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचा खात्मा करणाऱ्या टीममध्ये होते. अनेक नामचीन गुंडांच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले. प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या एन्काउंटर विषयी सांगितले.

तुम्ही किती एन्काउंटर केले या प्रश्नावर उत्तर देताना शर्मा म्हणाले, त्यावेळी गँगस्टर यांची गुन्हेगारी हाताबाहेर गेली होती. गँगस्टरचा खात्मा करण्यासाठी हजारो कारवाया केल्या. कारवाई दरम्यान अनेक मोठ्या गुन्हेगारांना पकडले. तर काही जणांचा मृत्यू झाला. मी किती एन्काउंटर केले हे मला देखील सांगता येत नाही. माझ्या एन्काउंटरचे येणारे आकडे हे मीडियाचे असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

मुळात मला एन्काउंटर स्पेशालिस्ट हे नाव आवडतच नाही. सेवेत असतानाही मी आनंदाने एन्काउंटर करत नव्हतो. देवाने ज्याला जन्म दिला आहे त्याला संपवणे हे आपले काम नाही. परंतु स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, कर्तव्य म्हणून एन्काउंटर करावे लागत होते, असे प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे. प्रदीप शर्मा यांनी खाकी उतरवून खादी घातली आहे. ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असल्याचे मानले जात आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like