Pradip Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे याच्यानंतर आता एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरावर आज सकाळी 6 वाजल्यापासून छापा घातला असून त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु आहे. सुरू आहे. दरम्यान, एनआयएने अखेर प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य पोलिस दलात आणि राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

एनआयएने आज प्रदीप शर्मा (Pradip Sharma) यांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकता स्थानिक पोलिसांची मदत न घेता थेट सीआरपीएफची मदत घेतली आहे. त्यातून एनआयए ने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविला आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात येत होता. त्यांच्याकडे यापूर्वी चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर आता एनआयएने ही कारवाई केली आहे.

अंधेरी येथील प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या 8 ते 10 कंपन्यांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविल्यामुळे यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. अंधेरीतील जे व्ही नगर भागात प्रदीप शर्मा यांचे एका पॉश सोसायटीत तिसर्‍या मजल्यावर घर आहे़ त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय आहे़

प्रदीप शर्मा यांनी आतापर्यंत 100 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत.
त्यामुळे ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.
मात्र, सचिन वाझे याला अ‍ॅटिलिया प्रकरणात मदत केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
आता प्रदीप शर्मा यांना अटक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title :- Pradeep Sharma finally arrested by nia

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत