Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यानंतर आता एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) यांच्या घरावर आज सकाळी ६ वाजल्यापासून छापा घातला (nia raid on encounter specialist pradeep sharma) असून त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु आहे.
एनआयएने (NIA) आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकता स्थानिक पोलिसांची मदत न घेता थेट सीआरपीएफ (CRPF) ची मदत घेतली आहे.
त्यातून एनआयए (NIA)  ने मुंबई पोलिसां (Mumbai police)वर अविश्वास दाखविला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांच्या अ‍ॅटिलिया (antilia house) या निवासस्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (mansukh hiren death case) सचिन वाझे (Sachin Vaze) याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात येत होता. त्यांच्याकडे यापूर्वी चौकशीही करण्यात आली होती.
त्यानंतर आता एनआयएने ही कारवाई केली आहे.
त्याचवेळी या कारवाईची माहिती बाहेर पडु नये, म्हणून एनआयएने बंदोबस्तासाठी थेट सीआरपीएफची मदत घेतली आहे.

अंधेरी (Andheri) येथील प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या ८ ते १० कंपन्यांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत
मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविल्यामुळे यावरुन आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. अंधेरीतील जे व्ही नगर भागात प्रदीप शर्मा यांचे एका पॉश सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर घर आहे.
त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय आहे़

प्रदीप शर्मा यांनी आतापर्यंत १००हून अधिक एन्काऊंटर केले आहेत.
त्यामुळे ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.
मात्र, सचिन वाझे याला अ‍ॅटिलिया प्रकरणात मदत केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर आता मुंबई पोलिसांचे पथकही येथे बंदोबस्तासाठी पोहचले आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pradeep Sharma | nia raid on encounter specialist pradeep sharma andheri home

हे हि वाचा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स

 

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

 

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

 

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार