Pradeep Uppoor Passes Away | ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन : Pradeep Uppoor Passes Away | बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली असतानाच आता ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेचे निर्माता प्रदीप उप्पूर यांचे निधन (Pradeep Uppoor Passes Away) झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीप हे कर्करोगाने त्रस्त होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि सीआयडी या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम यांनी पोस्ट शेअर करत प्रदीप यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. प्रदीप यांनी आजवर अनेक मालिकांसह सिनेमांची देखील निर्मिती केली आहे.

प्रदीप यांच्या निधनानंतर (Pradeep Uppoor Passes Away) शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर प्रदीप यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले “सीआयडीचे आधारस्तंभ आणि निर्माते… नेहमीच हसतमुख असलेला प्रामाणिक मित्र.. तुझ्या जाण्याने आज माझ्या आयुष्यातील एक चॅप्टर संपला आहे… खूप खूप प्रेम”. प्रदीप आणि शिवाजी हे खूपच खास मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे त्यांच्यात अधिक जवळीक वाढली होती. आता प्रदीप यांच्या जाण्याने शिवाजी यांना फारच मोठा धक्का बसला आहे.

सीआयडी याच मालिकेतील अभिनेता नरेंद्र गुप्तेनीही प्रदीप यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत एक पोस्ट
शेअर केली आहे. त्यावेळी ते म्हणाले, “माझं प्रदीपसोबतचं नातं खूपच कमाल होतं.
तो माणूस म्हणून खूपच चांगला होता. आज मी माझ्या आयुष्यातला एक चांगला माणूस गमावला आहे.
” दोन वर्षांपूर्वी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘नेल पॉलिश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
प्रदीप यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. प्रदीप यांनी आजवर ‘आहट’, ‘सीआयडी’, ‘सुपकॉप्स वर्सेस सुपरविलेन्स’,
‘सतरंगी ससुराल’ यासारख्या मालिकांची निर्मिती केली आहे. आता त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title :-  Pradeep Uppoor Passes Away | cid producer pradeep uppoor passes away actor shivaji satam shared post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा