‘सप्तपदी’ नाही 8 फेऱ्या, कन्यादान फक्त 1 रुपयांत ; ‘या’ खेळाडूचा खास ‘विवाह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लग्न संस्कृतीत सप्तपदी हा महत्वाचा विधी मानला जातो. या सप्तपदीत सात फेऱ्या घेत सात जन्माचे वचन दिले जाते. परंतू तुम्ही कधी लग्नात आठ फेऱ्या घेतल्या असे वाचले, ऐकले किंवा पाहिले आहे. परंतू नुकताच हा प्रकार एका भारतीय खेळाडूच्या लग्नात घडला. दंगल गर्ल बबीता फोगट हिचा विवाह भारतीय केसरी कुस्तीपटू विवेक सुहागशी झाला. दणक्यात पार पडलेल्या या लग्न सोहळ्यात एका लग्नाची अनोखी बात पाहायला मिळाली.

बबीता फोगटने फक्त हे हटके लग्न केले नाही तर त्याद्वारे देशासमोर आदर्श देखील ठेवला आहे. या लग्नात सप्तपदी नाही आठ फेरे घेण्यात आले. विवाहात आठ फेऱ्या घेत बबीता आणि विवेक यांनी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ असा संदेश दिला.

कुटूंबातील नातेवाइकांबरोबरच अनेक परदेशी पैलवान देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होते. बालली गावात कोणत्याही हुंड्याशिवाय, देणगी न घेता हा विवाह करण्यात आला. विशेष म्हणजे फक्त 1 रुपयात कन्यादान करत हे लग्न पार पडले.

या लग्नसोहळ्यात फक्त 21 पाहुणे उपस्थित होते. परंतू आज दिल्लीत एक मोठे रिसेप्शन असणार आहे. या रिसेप्शनला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह विदेशातील अने नेते, कुस्तीपटी उपस्थित असतील अशी शक्यता आहे.

बबीता आणि विवेक यांची पहिल्यांदा मैत्री होती, दिल्लीत ताज हॉटेलमध्ये दे एका कार्यक्रमात भेटले होते. मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. कुटूंबीयांना आपल्या नात्याची माहिती दिल्यानंतर हा विवाह पार पडला. 2 जूनलाच त्यांच्या कुटूंबांनी त्यांना होकर दिला आणि 1 डिसेंबरला विवाह पार पडला.

विशेष काय तर ती आठवी फेरी, ही आठवी फेरी होती बेटी बचाओ, बेटी पढाओ यासाठी. या प्रतिज्ञेसह त्यांनी आठवी फेरी पूर्ण केली. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करत त्यांनी रोपटे देखील लावले. लग्नाचा हा छोटासा परंतू आदर्श घालून देणारा सोहळा हरियाणाच्या दादरी जिल्हातील बलाली गावात पार पडला.

Visit : policenama.com