PM आवास योजना-ग्रामीण : अमित शाह म्हणाले – ‘मोदी सरकार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला देणार घर’

गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी म्हटले की, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (पीएमएवाय-जी) गरीबांना सन्मानाचे जीवन प्रदान करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे आणि योजनेचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांना दिला जात आहे.

अमित शाह यांनी म्हटले की, पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करून देईल. शाह यांनी अहमदाबादच्या शिलजमध्ये एक किलोमीटर लांबीच्या ओव्हरब्रिजच्या व्हर्च्युअल उद्घाटनादरम्यान हे वक्तव्य केले.

शाह म्हणाले, ज्या प्रकारे आमचे भाजपा सरकार देशात ग्रामीणसह शहरी भागात आवास योजना राबवत आहे, मला विश्वास आहे की, 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशात सर्वांना राहण्यासाठी एका घराची सुविधा असेल. नरेंद्र मोदी सरकारने 10 कोटीपेक्षा जास्त परवाडणारी घरे प्रदान केली आहेत.

त्यांनी म्हटले, आमच्या पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेंतर्गत 13 कोटीपेक्षा जास्त गरीब कुटुंबांना गॅस प्रदान केले. देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहचवली आणि आता आम्ही 2022 पर्यंत देशाच्या प्रत्येक घरात पाण्याची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी काम करत आहोत.

शाह यांनी हिंदीत ट्विट करत म्हटले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वात पीएमएवाय-जी च्या अंतर्गत आतापर्यंत 1.26 कोटी घरे बनवली गेली आहेत. पीएमएवाय-जी गरीबांना सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठी मोदी यांचा संकल्प आहे. पंतप्रधानांनी पीएमएवाई-जी द्वारे उत्तर प्रदेशच्या 6.1 लाख लाभार्थ्यांना 2,691 कोटी रूपयांची रक्कम जारी केली.