Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) | रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती ! मोदी सरकारने ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) | रेशन कार्ड धारकांसाठी (Ration Card Holders) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) घेण्यात आला आहे. हा बदल अनेक राज्यांत आणि काही केंद्रशास‍ित प्रदेशांत केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेशन कार्डधारकांना गव्हापेक्षा तांदूळ अधिक मिळणार आहे.

 

सरकारने मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला. PMGKAY अंतर्गत ब‍िहार, केरळ आणि उत्‍तर प्रदेश या 3 राज्‍यांना मोफत व‍ितरणासाठी गहू दिला जाणार नाही. त्याचबरोबर, द‍िल्‍ली, गुजरात, झारखंड, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, उत्‍तराखंड आणि पश्‍च‍िम बंगालमधील गव्हाचा कोटा कमी केला आहे. तसेच उर्वरीत पंचवीस राज्यांच्या कोट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही.

 

दरम्यान, ‘मे ते सप्टेंबरपर्यंत सर्व 36 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या PMGKAY वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ तसेच, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदळातून केली जाईल,’ असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Ministry of Public Distribution) राज्यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

 

Web Title :- important news for ration card holders government cut wheat quota under pmgkay add more rice

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा