Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) | डिसेंबर नंतर सुद्धा गरिबांना ५ किलो मोफत रेशन मिळणार का, केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गरिबांना दर महिन्याला ५ किलो मोफत रेशन देणारी योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच पीएमजीकेएवायची (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. पण यानंतरही पीएमजीकेएवाय सुरू राहू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएमजीकेएवाय (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) योजनेला डिसेंबरनंतरही मुदतवाढ देण्याचा विचार करतील. सरकारकडे पुरेसा धान्यसाठा असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

 

जर पीएमजीकेएवायचा आणखी विस्तार करायचा असेल तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ निर्णय घेईल. शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सप्टेंबरमध्ये सरकारने पीएमजीकेएवायची मुदत तीन महिन्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली होती.

कोरोना पाहता सरकार घेऊ शकते निर्णय
कृषी राज्यमंत्री करंदलाजे यांनी सांगितले की, कोविड-१९ चे रुग्ण येत आहेत. ही योजना डिसेंबरपर्यंत आहे.
ती पुढे नेण्याबाबत पंतप्रधान निर्णय घेतील. मागील २८ महिन्यांत सरकारने पीएमजीकेएवाय (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY)
योजनेंतर्गत गरीबांच्या मोफत रेशन वितरणावर १.८० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
सरकारकडे अन्न सुरक्षा कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा अन्नधान्य साठा आहे.

 

मंत्री पुढे म्हणाले की पीडीएस आणि पीएमजीकेएवाय सारख्या कल्याणकारी योजनांसाठी अन्नधान्याची खरेदी सुरळीत सुरू आहे.
ही धारणा बरोबर नाही की, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये तांदूळ आणि गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :-pm modi will decide on extending pmgkay beyond december union minister shobha karandlaje

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे रेल्वे स्थानकावरुन अपहरण झालेले बाळ 12 दिवसांनी आईच्या कुशीत; दोनजण ताब्यात

Pune Crime | पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला पकडले, 270 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त

Supriya Sule | महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गलिच्छ झालयं; आदित्य ठाकरेंवरील आरोपावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य

Dhishkiyaon Movie | अहेमद आणि बायकोने मिळून केला प्रथमेशचा गेम! ‘ढिंशक्याव’ चित्रपटात पाहा त्यांच्या अनोख्या लग्नसोहळ्याची धमाल

Pune PMC News | पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ‘ईएसआईसी’चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल