Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

नवी दिल्ली : Pradhan Mantri Jan Arogya Yojana | कॅन्सर, डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर उपचार आता तालुका स्तरावरील हॉस्पिटलमध्ये सुद्धा होतील. यासाठी सरकार 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर (1.5 lakh health and wellness centers) ची स्थापन करण्यावर काम करत आहे. यापैकी 79 हजार हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) झाल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (Union Health Minister Mansukh Mandavia) यांनी ही माहिती मंगळवारी दिली (Serious ailments like cancer and diabetes will now be treated at taluka level hospitals).

प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा

आरोग्य मंत्री म्हणाले, आता कॅन्सर आणि डायबिटीज सारख्या आजारांचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा होईल. याची चाचणी सुद्धा तिथेच केली जाईल.

मंडाविया म्हणाले, गावांपासून शहरापर्यंत हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडली जात आहेत. या केंद्रांमध्ये गंभीर आजारांची चाचणी आणि उपचारांची व्यवस्था असेल.

प्रत्येक जिल्ह्यात 100 कोटी रुपये खर्च

मनसुख मंडाविया यांनी म्हटले की, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बांधाकामावर एका जिल्ह्यात 90 ते 100 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
पुढील 4-5 वर्षात हे पैसे खर्च केले जातील.
डिसेंबर 2022 पर्यंत 1.50 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडण्याचे लक्ष्य आहे.
यापैकी 79,415 सेंटर काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘आरोग्य साथी’ योजना

आरोग्य मंत्री म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) आतापर्यंत 2.31 कोटी लोकांवर उपचार करण्यात आले आहेत.
हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत देशातील 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केयर हॉस्पिटल ब्लॉक (Critical care hospital blocks) ची स्थापना केली जाईल.

इतकेच नव्हे, राज्यस्तरावर किमान 15 हेल्थ इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (Health Emergency Operations Centers) ची स्थापना होईल, तर नॅशनल हाय-वे वर 2 कंटेनर मोबाइल हॉस्पिटलची सुरुवात केली जाईल (2 container mobile hospitals will be started on the National Highway).

मोदींचा ‘टोकन से टोटल’पर्यंतचा मंत्र

आरोग्य मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी विस्तृत आरोग्य सुविधांवर जोर दिला आहे. त्यांनी ‘टोकन से टोटल’ (Token se Total) पर्यंतचा मंत्र दिला आहे.
पीएम मोदी यांच्या मार्गदर्शनात आरोग्य मंत्रालय देशाच्या सर्व तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चांगल्या गुणवत्तेच्या आरोग्य सुविधा विकसित करण्यावर काम करत आहेत.

आरोग्यातून समृद्धी

मंडाविया यांनी म्हटले की, आरोग्य देशाला समृद्ध देश बनवू शकते. यासाठी आयुष्मान भारत संपूर्ण देशात प्रायमरी, सेकेंडरी, टर्सियरी, डिजिटल आणि लवचिक आरोग्य प्रणालीची सुरुवात केली जात आहे.
त्यांनी म्हटले की, भारत आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे कंटेनर आधारित दोन हॉस्पिटल काम करत आहेत.

हे देखील वाचा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update