फायद्याची गोष्ट ! 64.5 लाख लोकांना मिळणार 36 हजार रूपये वर्षाला, तुम्ही देखील घेऊ शकता ‘लाभ’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत 64,42,550 लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळेल. आपण पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या तीन वर्गांना समर्पित अशी योजना आहे, जेणेकरुन म्हातारपणात कुणालाही हात पसरवावे लागणार नाही. आपण नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तीन योजनांमधील बहुतेक अटी समान आहेत. जाणून घेऊया तीन योजनांविषयी

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 मार्च 2019 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे पंतप्रधान श्रमयोगी मानधनच योजनेची औपचारिक सुरुवात केली. यासाठी नोंदणी 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली. दरमहा वेतन आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांना पेन्शन देण्याची ही योजना सर्वात मोठी योजना आहे. या योजनेंतर्गत कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर वर्षाकाठी 36,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) किंवा राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ईएसआयसी) किंवा आयकर भरणारे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. महिन्याकाठी 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही योजना आहे. ही योजना देशातील 42 कोटी कामगारांना समर्पित आहे. ज्यात 5 मे पर्यंत 43,84,595 लोक सामील झाले आहेत.

पीएम किसान मानधन योजना
पीएम मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. पण त्याअंतर्गत नऊ ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकर्‍यांना समर्पित सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. आतापर्यंत 20,19,220 शेतकरी जोडले गेले आहेत, ज्यांना 60 वर्षे पूर्ण केल्यावर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. सर्व 12 कोटी लघु व सीमांत शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. लहान आणि सीमांत शेतकरी असे आहेत की, ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत शेती आहे. तसेच नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर यासाठी त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे घेतली जाणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट योगदान देण्यास निवडू शकतात. अशा प्रकारे, त्याला थेट त्याच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

पंतप्रधान लघु व्यवसाय निधी योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंडच्या रांची येथे लहान व्यापाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना सुरु केली. छोट्या व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा पुढाकार प्रधानमंत्री लघू व्यापरी धन धन योजनेंतर्गत घेण्यात आला. त्याअंतर्गत 60 वर्षांच्या वयानंतर त्याला 36,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. ही योजना सर्व दुकानदार, स्वयंसेवक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी असून वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य आणि आयकर भरणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत 38,735 छोट्या व्यावसायिकांनी त्यात नावनोंदणी केली आहे.

निवृत्तीवेतन योजनेच्या सामान्य अटी :
(1 ) तिन्ही योजनांमध्ये वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे.

(2) ईपीएफओ, ईएसआयसी सदस्य आणि आयकर भरणाऱ्यांना लाभ मिळणार नाही.

(3) आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.

( 4) वयानुसार प्रीमियम 55 ते 200 रुपये असेल. एवढेच पैसे सरकार देईल.

(5) वयाच्या 60 वर्षानंतर, महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार.

(6) नजीकच्या सामान्य सेवा केंद्रात ( CSC ) नोंदणी करता येते.