शेतकर्‍यांनो 3000च्या पेन्शनसाठी ‘येथे’ रजिस्ट्रेशन करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १५ ऑगस्टला केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आणलेल्या ‘प्रधानमंत्री किसान पेन्शन योजने’ची घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्याच कॅबिनेटमध्ये या योजनेला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला या योजनेचे अनावरण करण्याची शक्यता आहे. त्याबाबत १५ ऑगस्टच्या अनावरणा संबंधी कृषि सचिवांनी राज्यांना पत्र लिहून या योजनेसाठी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकाने आणलेल्या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रति महिना ३००० रुपये पेन्शन देण्यात येईन. ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना ही पेन्शन मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वयाच्या १८ ते ४० वयात नोंदणी करावी लागणार आहे. भारतीय जीवन विमा निगमकडूनच ही योजना चालविण्यात येणार आहे. तसंच या योजनेसाठी नोंदणी एलआयसीकडेच करावी लागणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत हि माहिती दिली.

नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे हे कागदपत्र असणे आवश्यक 

१) आधार कार्ड

२) जमिनीचा सात-बारा

३) बँक पासबुक

४) रेशन कार्ड

५)  २ फोटो

कृषि विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसान ‘किसान कॉमन सर्व्हिस सेंटर’ तर्फे या योजनेत नोंदणी करू शकता. तसंच शेतकरी आपल्या जिल्ह्यातील लेखापाल आणि कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात. या योजने अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हा उद्देश आहे. पुढच्या आठवड्यात यांची नोंदणी सुरु होणार असून सरकारकडून माहिती दिली जाईल.

या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

१) १८ वर्षाच्या शेतकऱ्यांना ५५ रुपये महिन्याला भरावे लागणार आहे.

२) योजनेत नोंदणी करताना वय २९ असल्यास त्या व्यक्तीला १०० रुपये दरमहा भरणे अपेक्षित आहे. म्हणजे कमी वय कमी रक्कम असा काहीसा नियम या योजनेला लागू आहे.

३) केंद्र सरकार या योजनेत समान प्रमाणात निधी देईल.

४) या योजने अंतर्गत शेतकरी पीएम शेतकरी योजनेतून मिळणारे पैसे थेट या योजनेत पाठवू शकता.

५) पारदर्शकतेसाठी या योजनेची संबंधी तक्रारी नमुद करण्यासाठी ऑनलाईन सुविधा करण्यात आली आहे.

६) जर नोंदणी असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या पती किंवा पत्नीला योजनेची ५० टक्के रक्कम मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त