PM-Kisan : नोव्हेंबरपर्यंत 1.7 कोटी शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येणार 2000 रूपये, दुरूस्त करून घ्या तुमचं रेकॉर्ड, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 9 ऑगस्ट रोजी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधानांनी 17 हजार कोटी हस्तांतरित केले होते. त्यानंतर पुढील 20 दिवसांत केंद्रीय कृषी मंत्रालयाने 30 लाख अजून शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये पाठविले आहेत. आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल बोलत आहोत. यासह या महिन्यात 8 कोटी 81 लाख लाभार्थी झाले आहेत. आपल्या बँक खात्यात पैसे आले नसल्यास आपले रेकॉर्ड तपास करून घ्या की त्यात काही चूक तर झालेली नाही. कारण यावर्षी नोव्हेंबरपर्यंत जवळपास पाऊणे दोन कोटी अजून शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच पैसे मिळण्याची शक्यता अद्याप संपलेली नाही.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत देशातील सुमारे 10 कोटी 50 लाख शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत नोंदणी केली होती. हे असे शेतकरी आहेत ज्यांची कागदपत्र योग्य राखली गेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे देऊन त्यांचे उत्पन्न वाढावे, अशी सरकारची इच्छा आहे. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सरकारच्या या अपेक्षेप्रमाणेच काही कृषी तज्ज्ञांचे देखील म्हणणे आहे. म्हणूनच ते देखील याबाबत रक्कम वाढविण्याचा सल्ला देत आहेत. स्वामीनाथन फाउंडेशननेही पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दिलेली रक्कम वार्षिक 6000 रुपयांवरून 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय किसान महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद आणि किसान शक्ती संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी ही रक्कम वाढवून 24 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे.

जाणून घ्या, कोणाला होऊ शकतो फायदा आणि कोणाला नाही

– असे शेतकरी जे भूतपूर्व किंवा वर्तमानात घटनात्मक पदाधिकारी, विद्यमान किंवा माजी मंत्री, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना या योजनेत विचारात घेतले जाणार नाही. मग ते शेती करीत असतील तरीही त्यांना विचारात घेतले जाणार नाही.

– केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजाराहून अधिक पेन्शन मिळविणार्‍या शेतकर्‍यांना लाभ मिळणार नाही. बाकीचे पात्र असतील.

– व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जो कुठे शेती देखील करत असेल तरी त्याला कोणताही लाभ मिळणार नाही.

– गेल्या आर्थिक वर्षात आयकर भरलेले शेतकरी या लाभापासून वंचित राहतील.

– केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी / गट डी कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.

आपले रेकॉर्ड दुरुस्त करून घ्या

ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांनी त्यांचे रेकॉर्ड तपासावे. जर आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकामध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावी, जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही गडबड झाल्यास आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. आधीच 1.3 कोटी शेतकऱ्यांना अर्ज करूनही त्यांच्या नोंदीत काही त्रुटी आहेत किंवा आधारकार्ड नसल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत.

कसे तपासणार रेकॉर्ड

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर (pmkisan.gov.in) लॉग इन करा. यानंतर, त्यामध्ये दिलेल्या ‘Farmers Corner’ टॅबवर क्लिक करा. जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहिती त्यात आढळेल. नावाचे स्पेलिंगही तपासा.

या हेल्पलाइन नंबरवर मिळवा मदत

अर्ज केल्यानंतरही जर आपल्याला पैसे मिळत नाहीत, तर आपल्या लेखापाल आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. तेथून काम होत नसेल तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या हेल्पलाइन (पंतप्रधान-किसान हेल्पलाईन 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) वर संपर्क साधावा. जर तेथून जरी काम होत नसेल तर मंत्रालयाचे दुसरे क्रमांक (011-24300606, 011-23381092) वर बोलावे.