5 कोटी शेतकऱ्यांना मिळाला मोदी सरकारच्या ‘या’ स्कीम फायदा,तुम्हाला हवाय मग अशी करा नोंदणी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या तीन टप्प्याचा लाभ आतापर्यंत देशातील ४.९४ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. तर ९.५ कोटी शेतकरी अद्यापही या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या टप्यात ७.६२ कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, जरी आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केले नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण कोणतीही व्यक्ती आता या योजनेच्या पोर्टलवर जाऊन स्वत: ची नोंदणी करू शकते. या योजनेंतर्गत सुमारे ८७ हजार कोटी रुपये पाठवायचे आहेत, त्यापैकी आतापर्यंत केवळ ३७ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच येत्या काही महिन्यांत ५० हजार कोटी रुपये पोहोचणार आहेत.

राज्य सरकार माहिती पाठवत नाहीत : केंद्रीय मंत्री
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अनेक वेळा संबंधित माहिती पाठविण्याची विनंती केली गेली होती, परंतु राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह काही राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची माहिती पुरवली नाही. यामुळे संबंधित राज्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही. मी राज्य सरकारांना विनंती करतो की, शेतकर्‍यांना अडकवून ठेवण्यापेक्षा तातडीने त्यांची माहिती केंद्र सरकारला पाठवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

पश्चिम बंगाल स्वीकारत नाही ही योजना :
देशभरात मिळणाऱ्या या योजनेचा लाभ फक्त पश्चिम बंगालमध्ये मिळत नाही. कारण तेथील सरकारने या योजनेचा स्वीकार केलेला नाही. पंतप्रधान-किसान योजनेत राज्य सरकार त्यांच्या शेतकऱ्यांचा डेटा केंद्राकडे पाठवतात. त्या आधारे केंद्राकडून पैसे जाहीर केले जातात. यापूर्वी दिल्ली सरकारने देखील विरोध दर्शविला होता, परंतु नंतर त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची माहिती पाठविली, ज्यामुळे तेथील शेकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत भाजप ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करत आहे.

राजस्थान, मध्य प्रदेशातील किती शेतकऱ्यांना फायदा :

राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही कॉंग्रेस शासित राज्य सरकारांनी आपल्या शेतकर्‍यांची माहिती केद्रांकडे पाठविली नव्हती. परंतु आता दोन्ही राज्यांनी ती पुरवली असून केंद्रातून त्यांना मदत दिली जात आहे. राजस्थानातील भाजप खासदार दिया कुमारी यांनी पंतप्रधान-किसान निधीचे पैसे शेतकऱ्यांना न मिळण्याबाबत विचारले होते. यावर मंत्री म्हणाले की, राज्यामधून संबंधित यादी येत असून केंद्राकडून पैसे पाठविले जात आहेत. ८ डिसेंबरपर्यंत राजस्थानातील ५५,६५,७५६ आणि मध्य प्रदेशातील ५२,५१,०८३ शेतकर्‍यांना पैसे पाठविण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com