6000 रूपये मिळवण्यासाठी आता शेतकरी स्वतः करू शकतात ‘रजिस्ट्रेशन’, फक्त करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 7.63 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळाले असून 3.65 कोटी शेतकऱ्यांना याचा तिसरा हफ्ता देखील मिळाला आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी तिसऱ्या हफ्त्याची प्रतीक्षा करत आहेत. जर तुम्ही देखील या योजनेत अर्ज केला आहे आणि तुम्हाला तिसरा हफ्ता मिळाला नसेल तर याची माहिती जाणून घेणे फार सोपे आहे. केंद्रीय कृषि राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुम्ही याविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

चौधरी यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि, तुम्हाला या योजनेत सहभागी होण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही थेट पीएम किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता. जास्तीतजास्त शेतकऱ्यांना या योजनेशी जोड्याण्याचे यामागील उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे राज्य सरकारांना यामध्ये बदल करण्यासाठी कमी वेळ लागणार असून त्यांना याचा फायदा होणार आहे.

या योजनेचा फायदा घेण्यामध्ये उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून येथे जवळपास पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. यामधील 1.24 कोटी शेतकऱ्यांना याचा तिसरा हफ्ता देखील मिळाला आहे. दिल्लीमध्ये देखील 12 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत याचा फायदा मिळाला आहे. सुरुवातीला केवळ 12 कोटी शेतकऱ्यांसाठी हि योजना लागू करण्यात अली होती. मात्र पुन्हा सत्तेवर आल्यानंतर सरकारने आणखी 14.5 कोटी शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

याठिकाणी करा संपर्क –

जर कृषी अधिकारी किंवा कुणीही तुम्हाला याचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवत असेल तर तुम्ही थेट पीएम-किसान हेल्प डेस्क वरील ई-मेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्ही 011-23381092 या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या टोलफ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता.

Visit : Policenama.com