मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममुळं तब्बल 29 कोटी लोकांचा झाला फायदा, तुम्ही देखील घेऊन शकता ‘या’ पध्दतीनं लाभ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने लघु उद्योग सुरु करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना(PMMY) सुरु केली आहे. याद्वारे लोकांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी लहान रकमेचे कर्ज दिले जाऊ शकते. ही योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेचा लाभ आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी घेतला आहे. बुधवारी अर्थ मंत्रालयाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, बँका, NBFC आणि मायक्रो फाइनान्स संस्थांनी पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे गेल्या ६ वर्षात २८.६८ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना १४.९६ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. २०१५-२०१६ मध्ये या योजनेने १.१२ कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण करण्यात मदत केली आहे.
मुद्रा योजनेद्वारे तीन प्रकारचे लोन दिले जातात. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन यांचा समावेश आहे. शिशु लोनद्वारे ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. तेच, किशोर लोनद्वारे ५०,००० ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. तरुण लोनमध्ये ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते.
काय आहे मुद्रा लोन
मुद्रा योजना ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट ऍंड रिफाइनेंस एजन्सी'(MUDRA) चालवली जाते. याचा मुख्य उद्देश लघु आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे हा आहे. पंतप्रधान मोदी यांनी याची सुरवात करताना सांगितले होते की, स्वयंरोजगारात जोडलेल्या ५ कोटी ७५ लाख लोकांवर लक्ष देणे गरजेचे आहे. जे फक्त १७,००० रुपये प्रति युनिट कर्जासह ११ लाख कोटी रुपयांचा वापर करू शकतात आणि यामुळे १२ कोटी भारतीयांना रोजगार उपलब्ध होईल.
व्याज किती असते?
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणतेही व्याज निश्चित नाही. मुद्रा बँकांसाठी वेगवेगळ्या बँकांवर वेगवेगळे व्याज दर आकारू शकते. व्याज दर देखील कर्जदाराच्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि त्यांच्याशी संबंधित जोखमीवर अवलंबून असते.
अशा प्रकारे करा अर्ज
मुद्रा योजनेंतर्गत आपल्याला कर्जासाठी सरकारी किंवा बँक शाखेत अर्ज करावा लागेल. आपणास स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास मालकी किंवा भाड्याने असलेली कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन क्रमांक आणि इतर कागदपत्रे द्यावे लागतील.
या कागदपत्रांची आवश्यकता
मुद्रा कर्जासाठी कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो. तथापि, मुद्रा युजनेत महिला आणि अनुसूचित जाती/जमाती अर्जदारांना कर्जासाठी प्राधान्य दिले जाते. SBI कडून मुद्रा कर्ज घेण्यासाठी एक ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, बँक स्टेटमेंट, फोटो, विक्रीची कागदपत्रे, किंमतीचे कोटेशन, व्यवसाय आयडी आणि पत्ता प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय GST ओळख क्रमांक, आयकर विवरण परतावा याविषयी माहिती द्यावी लागेल. SBI च्या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता.