Pradhan Mantri Mudra Yojana | PNB देतंय 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोण घेऊ शकतो लाभ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ने ट्विटी करून माहिती दिली आहे. की, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) अंतर्गत बँक 50,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ग्राहकांना देत आहे. (Pradhan Mantri Mudra Yojana) या योजनेचा लाभ कसा घेता येईल ते जाणून घेवूयात…

योजनेचे तीन प्रकार आहेत.

1. शिशु कर्ज योजना – यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

2. किशोर कर्ज योजना – यामध्ये 50,000 रुपये ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळते.

3. तरुण कर्ज योजना – यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

कर्जासाठी हे कागदपत्र आवश्यक –

– ओळखीचा पुरावा – वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, फोटो आयडी

पत्त्याचा पुरावा – टेलीफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसेप्ट, आधार कार्ड, पासपोर्ट

अर्जदाराचा फोटो (6 महिन्यापेक्षा जुना नसावा)

जातीचा दाखला SC/ST/OBC

ओळखीचा दाखला/ बिझनेस एंटरप्रायसेस

कसे घेऊ शकता कर्ज (How to apply for Mudra Loan)

अधिकृत वेबसाइटवर जा (http://www.mudra.org.in/)

येथे लोन अ‍ॅप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करा.

शिशु, किशोर आणि तरुणसाठी एकच फॉर्म आहे.

कर्जाच्या अर्जात मोबाइल नंबर, आधार नंबर, नाव, पत्ता इत्यादी माहिती भरा.

2 पासपोर्ट फोटो लावा.

फॉर्म भरल्यावर कोणत्याही प्रायव्हेट बँकेत जा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करा.

बँकेचा ब्रँच मॅनेजर तुमच्या कामाची माहिती घेऊन त्या आधारे मुद्रा लोन मंजूर करतो.

Web Title :- Pradhan Mantri Mudra Yojana | pnb pradhan mantri mudra yojana get 10 lakh rupess benefits check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Price Today | ‘इथं’ 3 रुपये प्रति लीटर स्वस्त झाले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Fixed Deposit | केवळ 3 वर्षाची FD केल्यास मिळेल 7 टक्केपेक्षा जास्त व्याज; ताबडतोब चेक करा ‘डिटेल्स’

PMGY | PM मोदींनी तरूणांच्या रोजगारासाठी बनवला विशेष ‘प्लान’, 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा