‘जल जीवन मिशन’ या ‘महत्वकांक्षी’ योजनेची मोदी सरकारकडून घोषणा, होणार ३.५ लाख कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर ध्वजारोहन केल्यानंतर आता मोदींनी देशाला संबोधित करताना जल जीवन मिशनची घोषणा केली. ते यावेळी म्हणाले की, आता सरकारचे लक्ष प्रत्येक घरात पाणी पोहचवणे आहे. यासाठी सरकार जल जीवन मिशनवर काम करणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करेल. ते म्हणाले की, सरकार येणाऱ्या काळात या मिशनच्या माध्यामातून ३.५ लाख कोटी रुपये खर्च करेल.

नीति आयोगाचा इशारा –

नुकतच नीति आयोगाने जल संकटावर एक अहवाल सादर करत देशात जलसंकट निर्माण होण्याचे संकेत दिले होते. यात २१ शहरांचा समावेश करण्यात आला असून दिल्ली, बेंगलुरु, चेन्नई, हैदराबाद या शहरात जलसंकटचे आव्हान असणार आहे. देशात जलसंकटामुळे अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे असे देखील या अहवालात सांगण्यात आले होते. यामुळे जीडीपीला ६ टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. 

या योजनेची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाणी अडवणे, समुद्री पाणी, मायक्रो इरिगेशन, पाणी वाचवण्यासाठी अभियान याबाबत सामान्य नागरिकांनी सजग व्हावा तसेच मुलांना पाणीचे महत्व पटवून देण्यासाठी शिक्षण देण्यात यावे.

जन अभियान बनवणे आवश्यक –

पिण्याचा पाण्याची देशात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नीति आयोगाने व्यक्त केली होती, यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जैन मनी महुडी यांनी लिहिले आहे की, भविष्यात एक दिवस असा येईल की पाणी किराणा दुकानात विकेले जाईल.
१०० वर्षापूर्वी त्यांनी केलेले विधान सत्य ठरत आहे.  आज आपण किराणा मालाच्या दुकानातून पाणी खरेदी करत आहोत, ते म्हणाले की जल संचय हे अभियान सरकारी अभियान बनण्यात येणार नाही, ते जन अभियान बनले पाहिजे, लोक त्यात सहभागी झाले पाहिजे.

मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने देशातील गरिबी कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. आतापर्यंत आलेल्या सरकारने देशाच्या भविष्यासाठी काहीना काहीतरी केले. परंतू अजूनही ५० टक्के असे लोक आहेत ज्याच्या घरात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, लोक पाण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करत आहेत. प्रत्येकाच्या घरात वीज या योजनेनंतर आता मोदी सरकारने प्रत्येकाच्या घरात पाणी या योजनेची घोषणा केली आहे. मोदी सरकारचे आता हे लक्ष असून त्यावर ३.५ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –