महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०१९ महाराष्ट्रातील २ बालकांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या तृप्तराज अतुल पांड्या आणि ऐन्जल विजय देऊकुळे या दोघांना बाल शक्ती पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. त्यानंर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या पुरस्कारासाठी एकूण ३१ बालकांना नेमण्यात आले होते. तर, बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार असे २ प्रकारचे पुरस्कार बालकांना देण्यात आले.

तृप्तराज आणि ऐन्जल याव्यतिरिक्त २४ विद्यार्थी, २ वैयक्तीक आणि ३ संस्थांनाही हा पुरस्कार देण्यात आला. बाल शक्ती पुरस्कार आधी राष्ट्रीय बालक पुरस्काराने ओळखला जात होता. नाविण्यपूर्ण प्रयोग, समाज कार्य, अभ्यासू, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य दाखवणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदाण करण्यात येतो.

तृप्तराजला कला आणि संस्कृती या विभागात तर एन्जेल हीला क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगीरी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
स्मृतीचिन्ह, १ लाखांपर्यंत

You might also like