15 हजार कमाई असणार्‍यांना सरकार दरवर्षी देणार 36 हजार, जाणून घ्या ‘स्कीम’ बाबत सर्वकाही

नवी दिल्ली : जर तुमची कमाई 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही आतापर्यंत रिटायर्मेंटसाठी कोणतेही प्लॅनिंग केलेले नाही, तर चिंता करण्याची गरज नाही. मोदी सरकारची ही पेन्शन स्कीम तुमची मदत करू शकते. यामध्ये 60 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये किंवा वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.

या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात. या स्कीमचे नाव पीएम श्रमयोगी मानधन योजना आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेवूयात…

55 रुपयांच्या योगदानाने मिळवा 3000 पेन्शन
या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे. जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल. तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल. ज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल. जेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.

कोण उघडू शकतात हे खाते
पीएम-एसवायएम योजनेत असंघटित क्षेत्रातील लोक खाते उघडू शकतात. किंवा असे लोक ज्यांचे उत्पन्न 15 हजार रूपयांपेक्षा कमी आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. जर तुमचे EPF/NPS/ESIC ईपीएफ/एनपीएस/ईएसआयसी खाते अगोदरपासूनच असेल तर हे खाते उघडता येणार नाही.

असे करा रजिस्टेशन
पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल. यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

सर्व माहिती नोंदवल्यानंतर मंथली कॉन्ट्रीब्यूशनची माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला तुमचे सुरूवातीचे योगदान रोख भरावे लागेल. यानंतर खाते उघडले जाईल आणि श्रमयोगी कार्ड मिळेल. तुम्ही योजनेची माहिती 1800 267 6888 टोल फ्री नंबरवर सुद्धा घेऊ शकता.