खुशखबर ! मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये LED बल्ब मिळतो अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही देशाची प्रगती देशात किती कोणते साधनसंपत्ती आहे यावर अवलंबून असते. पंतप्रधान मोदींनी 2015 साली उजाला योजनेअंतर्गत एलईडी बल्बचे वितरण सुरु केले. योजनेचा उद्देश देशातील विजेचा वापर कमी करुन राष्ट्र निर्माणात योगदान देणे हा आहे. 4 वर्षानंतर या योजनेसंबंधी आनंदाची बातमी आली आहे. योजनेअंतर्गत देशात 36.02 कोटी बल्ब वितरित करण्यात आले आहेत. यामुळे एकीकडे 1000 कोटी रुपयांची बचत झाली आहे तर दुसरीकडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड सारख्या घातक गॅसचे उत्सर्जन कमी झाले आहेत.

मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार 2015 पासून आतापर्यंत देशात 36.02 कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात आले. यामुळे 18716 कोटीची बचत झाली. तर दुसरीकडे वर्षाला 46,790 एमएन (केडब्ल्यूएच) ऊर्जेची बचत झाली. जर रुपयात विचार केला तर 20 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ऊर्जा वाचली. या योजनेचा उद्देश्य पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे.

केंद्र सरकारने उचललेल्या या पाऊलातील हा सर्वात यशस्वी उपाय ठरला. या योजनेअंतर्गंत सबसिडाईज किंमतीला बल्ब विकण्यात आले. त्यामुळे बल्ब बाजारमुल्याच्या 40 टक्के कमी किंमतीने ग्राहकांना उपलब्ध झाले.

असा मिळेल एलईडी बल्ब
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या भागातील वीज वितरण कंपनीला तुम्हाला भेट द्यावी लागेल. तेथे आधार कार्ड, मतदान ओळख पत्र, पासपोर्ट आणि पत्ता दिल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. तुम्ही तुमचे वीज बिल देखील दाखवून याचा लाभ घेऊ शकतात.

मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार 2015 पासून आतापर्यंत देशात 36.02 कोटी एलईडी बल्ब वितरित करण्यात आले. यामुळे वातारणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनाच्या प्रमाणात कमी झाली. आता दरवर्षी वातारणात 3.78 कोटी टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत आहे. या योजनेअंतर्गत 2030 पर्यंत कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनात 33 ते 35 टक्के कपात करण्यात येईल.

उजाला कार्यक्रमाअंतर्गत 36 कोटीपेक्षा अधिक एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले. हा जगातील सर्वात मोठा एलईडी वितरण कार्यक्रम आहे. वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एनटीपीसी, पीएफसी, आरईसी आणि पावर ग्रीडच्या संयुक्त प्रयत्नातून ईईएसएलने सांगितले की उजाला योजना ऊर्जा संरक्षणाच्या माध्यमातून सरकार या महत्वपूर्ण कार्यक्रमाला जागतिक स्तरावर ऊर्जा बचतीबाबत मोठी भूमिका स्विकारेल.

visit : Policenama.com