home page top 1

मोदी सरकार ५ किलोच्या ‘टिल्लू’ सिलेंडरवर देखील देणार सबसिडी, ‘ही’ आहे योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता देशात १४ किलो एलपीजी सिलेंडरबरोबरच ५ किलो छोट्या सिलेंडरवर देखील सबसिडी मिळण्यास सुरुवात होऊ शकते. कारण हे आहे की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे ग्राहकांना दिली जाणाऱ्या EMI ची वसुली करणे. मागील वर्षी मार्च २०१८ मध्ये ६ रिफिल वर EMI न घेण्याची योजना होती जी २०१९ मध्ये संपेल. यामागे हा तर्क लावण्यात आला आहे की, एलपीजी सिलेंडरची रिफिलिंग वाढेल.

तेल मार्केटिंग कंपनीद्वारे पेट्रोलियम मंत्रालयाला देण्यात आलेल्या माहिती द्वारा, या योजनेमुळे जास्त फरक पडलेला नाही. त्यामुळे EMI ची रिकवरी पुन्हा सुरु करण्यात आली पाहिजे, पेट्रोलियम मंत्रालयाने याला पर्याय शोधण्यासाठी सांगितले आहे.

तेल कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल –

सरकार ५ किलो LPG सिलेंडरवर सब्सिडी देण्याचा विचार करत आहे. म्हणजेच पीएम उज्जवला योजनेअंतर्गत ग्राहकांना बाजार मूल्यनुसार छोटा सिलेंडर मिळेल. तसेच सब्सिडी आणि बाजार मूल्य यातील अंतरातील किंमत EMI रुपात तेल मार्केटिंग कंपन्याना देण्यात येतील. सबसिडी असलेल्या छोट्या सिलेंडरची किंमत काय असणार? हे ठरवण्यासाठी तेल कंपन्या यावर अजून काम करत आहे. असे सांगितले जात आहे की, रिफिल दरात वाढ झाल्याने तेल कंपन्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल.

उज्जवला योजनेअंतर्गत सरकार १६०० रुपयाची सबसिडी देते, ग्राहकांना एलपीजीची पहिली रिफिलिंग आणि स्टोव, पाईप तसेच रेग्युलेटर वर १६०० रुपये EMI च्या आधारे तेल मार्केटिंग कंपन्याना देण्यात येतील. या योजनेअंतर्गत ७,२२,४९३ लाभार्थींना एलपीजी गँस कनेक्शन देण्यात आले आहे.

सिनेजगत

‘पेहचान कौन’ ! ‘या’ दोन सौंदर्यवती आहेत दिग्गज अभिनेत्यांच्या मुली

अभिनेता संजूबाबाचं मराठी चित्रपटात ‘बाबा’ म्हणून पर्दापण !


आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

Loading...
You might also like