PMUY : उज्ज्वला योजनेमध्ये ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन, ‘फ्री’मध्ये मिळवा घरगुती गॅस सिलेंडर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस संकटांच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबांना विनामूल्य एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याची योजना आणखी तीन महिन्यांसाठी वाढविली आहे. ज्यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत तिसरे सिलिंडर घेतले नाही, ते सप्टेंबरपर्यंत घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर आपण गरीब कुटुंबातील असाल आणि अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण त्यासाठी अर्ज करू शकता.

उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी करणे खूप सोपे आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबातील एक महिला गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज करू शकते. आपण स्वत: या योजनेशी संबंधित अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com वर जाऊन सविस्तर माहिती मिळवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी पीएमयूवाय योजना सुरु केली.

अशा प्रकारे करू शकता अर्ज :
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि तो जवळच्या एलपीजी वितरकाला द्यावा लागेल. अर्जासोबतच महिलेला आपला संपूर्ण पत्ता, जन धन बँक खाते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक देखील द्यावा लागतो. या अर्जावर प्रक्रिया केल्यानंतर, देशातील तेल विपणन कंपन्या पात्र लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन जारी करतात. जर ग्राहक ईएमआयचा पर्याय निवडत असेल तर ईएमआय रक्कम सिलेंडरवरील अनुदानात समायोजित केले जाते.

उज्ज्वला योजनेंतर्गत तुम्ही एलपीजी कनेक्शन घेता तेव्हा स्टोव्हची एकूण किंमत 3,200 आहे. यात 1,600 रुपयांचे अनुदान थेट सरकारकडून दिले जाते आणि तेल कंपन्या उर्वरित रक्कम 1,600 रुपये देतात पण ग्राहकांना ईएमआय म्हणून तेल कंपन्यांना 1,600 रुपये द्यावे लागतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like