खुशखबर ! पंतप्रधान उज्ज्वला योजनेत मोठा बदल, मोफत गॅस कनेक्शन घ्या, 1 वर्षापर्यंत EMI नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेल्या आणि ग्रामीण भागात सर्वाधिक लाभार्थी असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन ग्राहकांकडून ईएमआय जमा करण्याची योजना सरकारने स्थगित केली आहे. आता नवीन ग्राहकांना १ वर्षासाठी ईएमआय द्यावा लागणार नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत ग्राहकांना मोफत गॅस कनेक्शन मिळते. तथापि, या योजनेतील बदलाचा फायदा केवळ १ ऑगस्ट २०१९ पासून योजनेत सामील झालेल्या ग्राहकांनाच उपलब्ध असेल. तेल कंपन्यांनी देखील जुलै २०२० पर्यंत ईएमआय पुनर्प्राप्ती योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन ग्राहकांकडून १ वर्षासाठी EMI सूट :
उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एक स्टोव्ह व एलपीजी सिलिंडर दिला जातो. त्याची एकूण किंमत ३,२०० रुपये आहे. यात सरकार १६०० रुपये अनुदान देते. त्याचबरोबर तेल कंपन्या उर्वरित १६०० रुपये ग्राहकांना कर्ज म्हणून देतात. ग्राहकांना ते ईएमआयच्या स्वरूपात परत द्यावे लागतील.

ईएमआयची रचना अशी आहे की एलपीजी सिलिंडर्सच्या रिफिलिंगवर तुम्हाला जी अनुदानाची रक्कम मिळाली पाहिजे, ती तुम्हाला न मिळता थेट तेल कंपन्यांच्या खात्यात टाकली जाते. जेव्हा आपण १६०० रुपये भरता तेव्हा आपल्याला अनुदान मिळणे सुरू होते. जोपर्यंत ग्राहक ईएमआय रक्कम भरत नाही तोपर्यंत त्यांना अनुदानाशिवाय बाजार दराने एलपीजी सिलिंडर खरेदी करावे लागणार होते. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना ईएमआय पूर्ण होईपर्यंत अनुदान मिळत नाही. यामुळे, रिफिल रेट इतका वाढत नव्हता.

सुरुवातीच्या ६ सिलिंडर रिफिलवर ईएमआय नाही :
४.२ किलोचे सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पहिल्या ६ रिफिलमध्ये कोणताही ईएमआय भरावा लागणार नाही. ईएमआय सातव्या रीफिलपासून सुरू होईल. त्याचप्रमाणे आपण ५ किलो एलपीजी सिलिंडर खरेदी केल्यास इएमआय सुरुवातीच्या १७ रिफिलमध्ये भरणे आवश्यक नाही. तुम्हाला अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळेल.

या ग्राहकांना लाभ मिळणार :
ऑगस्ट २०१९ पासून उज्ज्वला योजनेत सामील झालेल्या ग्राहकांना ईएमआय देण्याची गरज भासणार नाही आणि हा लाभ जुलै २०२० पर्यंत ग्राहकांना देण्यात येईल.