‘या’ सरकारी स्कीमसाठी बंधनकारक झालं ‘आधार’कार्ड, अन्यथा पैसे मिळायचे थांबतील, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने प्रधानमंत्री व्यय वंदना योजने (PMVVY) साठी आधार अनिवार्य केले आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना काढून माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ही योजना केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ८% व्याज मिळते. ही योजनेचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता.

१२ अंकी आधार क्रमांक अनिवार्य असेल:
अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘ज्या कोणालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना १२ अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल.’ २३ डिसेंबर रोजी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.

आधार क्रमांक नसेल तर अर्ज करा:
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, जर कोणालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर प्रथम आधार कार्डसाठी अर्ज करा. आधार कार्डसाठी अर्ज केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

बायोमेट्रिक प्रमाणीकरण नसल्यास काय करावे:
जर खराब बायोमेट्रिकमुळे आधार प्रमाणीकरण यशस्वी होत नसेल तर अर्थ मंत्रालयातील वित्तीय विभाग संबंधित व्यक्तीस आधार क्रमांक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करेल.

बायोमेट्रिक किंवा ओटीपी (OTP) आधारित प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास आधार पत्रावर दिलेल्या क्यूआर कोडद्वारे आधार प्रमाणीकरण देखील केले जाऊ शकते.

मार्च २०२० पर्यंत सदस्यता घेऊ शकता:
प्रधानमंत्री व्यय वंदना योजने (PMVVY) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची कमाल मर्यादा १५ लाख रुपये करण्यात आल्याचे वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात सांगण्यात आले. या योजनेला मार्च २०२० पर्यंत सब्सक्राइब केले जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/