खुशखबर ! PM मोदींची खास स्कीम – ‘दररोज 1 रुपया खर्च करून मिळवा 2 लाख’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या काळात कमीत कमी एक टर्म इंश्युरंस प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. अनेकजण भरमसाठ प्रीमियमच्या भीतीने टर्म इंश्युरंसपासून वाचत असतात. अशा लोकांसाठी आता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना एक चांगला पर्याय आहे. यामध्ये एक टर्म प्लॅन आहे. ज्यात गुंतवणूक केल्यानंतर जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

काय आहे टर्म प्लॅन ?

कोणत्याही टर्म प्लॅनचा अर्थ जोखीमपासून सुरक्षा असतो. टर्म प्लॅन अंतर्गत जेव्हा पॉलिसीधारकचा मृत्यू होतो तेव्हाच कंपनी इंश्युरंसची रक्कम अदा करते. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, जर पॉलिसी घेणारा व्यक्ती मुदत पूर्ण झाल्यानंतरही ठिक असेल तर त्याला कोणताही लाभ मिळत नाही.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना का आहे चांगला पर्याय ?

– हा टर्म प्लॅन घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे आहे.
– या पॉलिसीचं मॅच्युरिटी वय 55 वर्षे आहे. ही टर्म प्रत्येक वर्षी अ‍ॅश्योर्ड करणं गरजेचं असतं. यात एकूण विम्याची रक्कम दोन लाख रुपये आहे.
– या टर्म प्लॅनचा वार्षिक हप्ता 330 रुपये आहे. ही रक्कम बँक अकाऊंटमधून ECS द्वरे काढली जाऊ शकते.
– ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे की, या याोजनेच्या रकमेत बँक प्रशासकीय फी आकारतात. यात अतिरीक्त GST देय आहे.
– या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात.
– योजनेंतर्गत टर्म प्लॅनची रक्कमही एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी निवडली जाऊ शकते.
– दीर्घकाळाच्या विम्याचा पर्याय निवडल्यानंतर बँक प्रत्येक वर्षी हप्त्याची रक्कम बँकेच्या बचत खात्यातून स्वत: कापते.
– प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कधीही खरेदी केलेली असो पहिल्या वर्षासाठी त्याचं कव्हरेज पुढील वर्षातील मे 31 पर्यंतच होईल.
– यानंतर प्रत्येक वर्षी 1 जून रोजी बँक खात्यातून हप्त्याची रक्कम अदा करून त्याचे नुतनीकरण केले जाऊ शकते.

 

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like