फायद्याची गोष्ट ! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेवर मिळवा 10 हजारांपर्यंत पेन्शन, उरले फक्त 3 महिने, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार असेल तर आत्मनिर्भर असल्याचा आनंद होते. त्यासाठी पेन्शन संबंधित अनेक योजना देखील आहेत. ज्या फक्त निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशीच भारत सरकारची योजना आहे पंतप्रधान वया वंदना योजना (PMVVY). या योजनेत गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला 8 ते 8.30 टक्के व्याज मिळते. परंतु व्याज देखील मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायावर अवलंबून असते. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 मार्च 2020 पर्यंत म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी कालवधी उपलब्ध आहे.

LIC च्या माध्यमातून योजनेचा लाभ –
2018-19 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने वरिष्ठ नागरिकांच्या योजनेची अंतिम तारीख वाढवून 31 मार्च 2020 केली होती. सरकारने त्याची मर्यादा वाढवून 15 लाख रुपये केली. तुम्ही ही योजना जीवन विमा निगमच्या (LIC) माध्यमातून घेऊ शकतात. शिवाय ही सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेऊ शकतात.

काय आहे योजनेचा फायदा –
या योजनेचा कालावधी 10 वर्षांचा असेल. 10 वर्षांनंतर जर तुम्हाला ही योजना कार्यन्वित ठेवायची असेल तर तुम्ही या योजनेत पुन्हा गुंतवणूक करु शकता. जर पेंशन धारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 वर्षांपर्यंत देखील जिवंत राहिल्यास संबंधित व्यक्तीला एरियरही दिला जाणार आहे. या योजनेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पेंशन धारकांचा मृत्यू झाला तर लाभार्थ्याला उर्वरित रक्कम परत केली जाणार आहे. या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी जिवंत राहिल्यास त्याला पॉलिसीच्या खरेदीवर रकमेसह अंतिम पेंशन हप्त्याहप्त्यानं दिली जाते. केंद्र सरकारच्या यो योजनेचा लाभ 60 वर्ष आणि त्यापेक्षा आधिक वयाचे वरिष्ठ नागरिक घेऊ शकतात.

या योजनेसाठी जास्तीत जास्त वयाची काही मर्यादा नाही. या योजनेंतर्गत जर मासिक पेन्शन मिळवू इच्छित असल्यास महिन्याला कमीत कमी 1 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते. तसेच तुम्ही किती कालावधीसाठी पेन्शन मिळवणार आहात ते पेन्शनच्या रक्कमेवर अवलंबून असतं. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शन 10000 रुपये मिळते.

किती पैशात किती लाभ –
मासिक पेंशन मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेत किमान 1.50 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. 10 हजार प्रति महिना पेंशन मिळवायची असल्यास तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे.