प्रफुल्ल पटेल यांची ‘ईडी’कडून तब्बल ८ तास चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नसल्याचे कारण देणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर पटेल हे आज ईडीसमोर हजर झाले आणि आठ तास चौकशीला सामोरे गेले.

यापूर्वी ईडीने समन्स बजावले होते मात्र पटेल यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहता येत नसल्याचे कळवले होते; पण ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावून हजर राहण्याचे फर्मान काढले.  त्यामुळे युपीए सरकारच्या कार्यकाळात कोट्यवधींच्या हवाई वाहतूक घोटाळा प्रकरण पटेल यांना भोवणार हे निश्चित झाले आहे. एअर इंडियाशी संबंधित हे प्रकरण असून झालेल्या नुकसानीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी माजी नागरी विमान वाहतूक मंत्री या नात्याने ईडीने पटेल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी दिल्लीतील कार्यालयात आठ तास चौकशी करण्यात आली. उद्या मंगळवारीही अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पटेल यांना बोलावण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार