रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचं ! प्रगती, कोयना एक्सप्रेस 10 दिवस बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रातील तांत्रिक आणि काही दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी पुढील 10 दिवस मध्ये रेल्वे कडून रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्याचे समजत आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कोयना एक्सप्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे.

हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस, मुंबई पंढरपूर पॅसेंजर, मुंबई विजापूर पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या असून हुबळी-मुंबई, हैद्राबाद, विशाखापट्टनम, नांदेड या गाड्याही मुंबईला न नेता पुण्यापर्यंतच धावणार आहेत. याशिवाय पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी 5 ते 14 ऑक्टोबर काळात दौंड-मन्माडमार्गे धावणार आहे.

अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. काही दिवसांपूर्वी मंकी हिलजवळही अशीच परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे 26 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा हा रेल्वे मार्ग 10 दिवस बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परिणामी एक्सप्रेस हायवे आणि जुन्या महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे.

Visit : Policenama.com