म्हणून… प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यरात्री अचानक स्ट्राँगरूममध्ये दाखल

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा आता फक्त शेवटचा टप्पा बाकी असून आता सर्वांचे लक्ष हे २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये देखील मतदान पार पडले असून, उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे.

येथील मशीन या जुन्या जेलमधील एका स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मात्र काल या ठिकाणी भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री उमाशंकर गुप्ता हे देखील होते. या मशीनची पाहणी करण्यासाठी त्या याठिकाणी आल्या होत्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, उमाशंकर गुप्ता म्हणाले कि, लोकशाहीचा निकाल या मशीनमध्ये बंद असून याठिकाणी त्या सुरक्षित आहेत कि नाही हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. जवळपास चाळीस मिनिटे ते दोघे त्याठिकाणी होते.

काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंग यांच्यावर आरोप

यावेळी त्यांनी दिग्विजय सिंग यांच्यावर देखील आरोप केले. निवडणूक मॅनेजमेंट करून जिंकता येते, त्यामुळे त्यांच्याकडून काही केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे दिग्विजय सिंग यांच्यावर आरोप करताना उमाशंकर गुप्ता म्हणाले. ते काहीही करू शकतात, त्यामुळे याठिकाणी भेट द्यायला आलो असल्याचे गुप्ता म्हणाले.

दरम्यान, या मशीनच्या सुरक्षा व्यवस्थेवर आपण असमाधानी असून याबाबत तक्रार करणार असल्याचे प्रज्ञा सिंग यांनी सांगितले .

Loading...
You might also like