Video : ‘FRP’ वरून आ. बच्चू कडूंच्या ‘प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ‘आक्रमक’ ; पुण्यात ‘साखर संकुल’च्या ‘गच्ची’वर जोरदार आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऊसाच्या एफआरपीवरून आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील साखर आयुक्त कार्य़ालयाचा ताबा घेतला. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुलनाच्या गच्चीवर जोरदार आंदोलन केले. महाराष्ट्रात १ हजार ५०० कोटी थकीत एफआरपी आहे. थकीत एफआरपी त्वरीत देण्याची मागणी करत प्रहार संघटनेने घोषणाबाजी केली.

सोलापूर आणि सातार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २०१८-२०१९ मधील थकीत एफआरपी त्वरीत मिळावी यासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहाशे कोटी रुपयांची आफआरपी थकीत आहे. शेतकऱ्यांचे पैसे १४ दिवसात मिळणे आवश्यक असताना चार महिने झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांची थकित रक्कम आठ दिवसात देण्यात यावी अशी मागणी केली. अगर शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलकांनी यावेळी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारखानदार आणि सरकार यांच्यामधील होत असलेल्या व्यवहाराची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. ही माहिती मिळण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात यावे. तसेच एफआरपीची माहिती ऑनलाईन मिळाली पाहिजे. शासनाने शेतकऱ्यांसाठी अ‍ॅप तयार केले आहे मात्र ते अद्याप सुरु झाले नाही. हे अ‍ॅप त्वरीत सुरु करावे अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.