स्वामी विवेकानंद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि साहित्य वाटप

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – दौंड तालुक्यातील आंबेगाव (पुनर्वसन) मध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद शाळेतील १०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थी व गरीब व होतकरु हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदशन करण्यासाठी या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग शेलार (कार्यकारी अभियंता खडकवासला जलसंपदा विभाग पुणे), श्री.पी. डी. शिंदे (उपकार्यकारी अभियंता खडकवासला जलसंपदा विभाग पुणे) हे आवर्जून उपस्थित होते.

पाण्याचे दिवसेंदिवस वाढत असलेले संकट आणि ते जपण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत पांडुरंग शेलार यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीला न घाबरता संपादन करण्यासाठी चांगली मेहनत घ्यावी त्यांना निश्चित चांगले यश प्राप्त होईल असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी केडगावचे विद्यमान सरपंच अजित सोमनाथ शेलार-पाटील, गोडावळे मामा, ग्रा.प. सदस्य शेखर मोरे, अभिजीत गायकवाड, अक्षय गायकवाड, सचिव सुभाष वाघोजी निढाळकर व इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like