‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मध्ये येसूबाईंच्या भूमिकेसाठी प्राजक्ता घेतेय प्रचंड मेहनत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – झी मराठी वरील मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मालकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. तिने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं खास प्रशिक्षण घेतलं आहे. नुकतंच तिने युद्ध मोहिमेवर निघाल्याच्या प्रसंगाचं शुटींग केलं. तिच्या या शुटसाठी खास चिलखत बनवण्यात आलं होतं. याबाबत बोलताना प्राजक्ताने सांगितले की, वेशभूषा टीमला हे चिलखत बनवण्यासाठी तब्बल 2 आठवडे लागले आहेत.

मालिकेत येसूबाई सध्या गरोदर आहेत. गरोदर दाखवण्यासाठी प्राजक्ताला पोटही लावण्यात आलं आहे. या चिलखताचे वजन 5 किलोहून अधिक आहे. तिने डोक्यावर लोखंडी शिरस्त्राणही घातलं आहे. त्यामुळे प्राजक्ताने तब्बल 15 किलोचं वजन अंगावर पेलून हे शुटींग पूर्ण केलं. प्राजक्ताने आपला हा अनुभव शेअर केला आहे. प्राजक्ता म्हणाली, ” मी पहिल्यांदाच चिलखत घालून शुटींग केलंय. कौतुकाची बाब अशी की खास या प्रसंगासाठी हे चिलखत बनवून घेण्यात आलं आहे. त्यामुळे याचं वजनही खूप आहे.”

पुढे बोलताना प्राजक्ता म्हणाली, “डोक्यावर जड लोखंडी शिरस्त्राण असल्याने मला माझी मान हलवणं देखील जड जात होतं. परंतु थोडा सराव केल्यानंतर मी शुटींग व्यवस्थित पूर्ण केलं. येसूबाईच्या भूमिकेने मला अनेक अविस्मिरणीय क्षण दिले आहेत. चिलखत आणि तलवार घेऊन शुटींग करताना मला एक वेगळीच प्रेरणा मिळाली. संभाजी राजे रायगडावर नाहीत आणि स्वराज्यावर हसन अली खानचे संकट येत आहे, यात येसूबाई मोहिमेवर निघण्याची तयारी करतात. या प्रसंगाचं हे शुटींग होतं. या काळात त्यांच्या पोटात शाहू राजे आहेत. असे असतानाही ही स्त्री किती कणखर होती हे यात समोर येतं. हे शुटींग मी कधीच विसरू शकत नाही.

 

Visit : policenama.com