Prajakta Mali | रेड कार्पेटवर साडी नेसून एंट्री का करते? प्राजक्ताने स्वतःच केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) गणना केली जाते. तिने आतपर्यंत मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले असून यातील तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता (Prajakta Mali) सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालन करते.

बऱ्याचदा प्राजक्ता साडी परिधान करत सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तिचा साडीमधील लूक विशेष लक्षवेधी ठरतो. ती कोणताही पुरस्कार सोहळा असला कि ती नेहमी साडी परिधान करत असते. याबाबत तिने आज खुलासा केला आहे. झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याला प्राजक्ताने नुकतीच हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरही तिने साडी परिधान करुन एंट्री केली. तर काही मराठमोळ्या अभिनेत्रींनी बोल्ड लुक केला होता.

प्राजक्ता (Prajakta Mali) साडी नेसण्याबाबत खुलासा करताना म्हणाली,
“आतापर्यंत मला असं वाटायचं की पुरस्कार सोहळ्यांसाठी फक्त गाऊन, वेस्टर्न ड्रेसच परिधान केले पाहिजे.
कारण अशा कार्यक्रमांसाठी अभिनेत्रींनी अशाप्रकारचे कपडेच परिधान करणं अपेक्षित असतं.
पण आता मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं आपण ज्यामध्ये भारी दिसतो तेच कपडे परिधान केले पाहिजे.
म्हणून मी साडी परिधान करते” असे प्राजक्ता म्हणाली आहे.

Web Title :-  Prajakta Mali | actress prajakta mali talk about why she wear saree for award function red carpet see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Supriya Sule | ‘माझ्या भोळेपणाचा ‘त्या’ नेत्याने फायदा घेतला, मला उल्लू बनवलं!’ – सुप्रिया सुळे