Prajakta Mali | ‘रानबाजार’मध्ये गुटखा खाण्याबद्दल प्राजक्ता माळीने केले ‘हे’ मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता माळी ही झी मराठी वाहिणींवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. प्राजक्ताने (Prajakta Mali) अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ती कायमच तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते.

गेल्या काही दिवसांपासून ती ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींची प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही सीरिज सुपरहिट ठरली होती. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली होती. गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली.प्राजक्ता माळीने साकारलेल्या पात्राचे नाव रत्ना असे होतं. यात तिने कामाठीपुरामधील सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. या वेबसिरीजमध्ये तिने काही बोल्ड सीनही दिले होते. ज्यावरुन तिला भरपूर ट्रोल केलं गेलं होत. यातील काही सीन्समध्ये ती गुटखा खातानासुद्धा दिसली तिचा गुटखा खातानाचा अभिनय इतका खराखुरा वाटत होता कि ती कन्हारया आयुष्यात देखील गुटखा खायची अश्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच प्राजक्ता माळीने याबद्दल भाष्य केले आहे.

वेबसीरिजदरम्यान ती गुटखा खायची, असं अनेकदा बोललं जायचं.
नुकतंच प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) याबद्दल भाष्य केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’
या कार्यक्रमादरम्यान प्राजक्ता माळीने यावर भाष्य केले.
प्राजक्ताला तू ‘रानबाजार’ वेबसीरिजदरम्यान साकारलेल्या पात्रासाठी खरंच गुटखा खायची? असे विचारल्यावर
तिने लगेचच नाही असे सांगीतले.“त्यावेळी मी बडीशेप खायचे. त्या पॅकेटमध्ये बडीशेप असायची.
त्याचं पॅकेजिंग गुटख्यासारखंच असायचं. पण त्याच्या आत असलेला माल मात्र वेगळा असायचा.
मी गुटखा खाणं शक्यच नाही”, असे प्राजक्ता म्हणाली.

Web Title :- Prajakta Mali | marathi actress prajakta mali talk about gutka eating during raan bazaar web series

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी