नागपूरच्या प्रज्वल नांदेकरने मलेरियाच्या जिवाणूंसंदर्भांत लावला महत्तवपूर्ण शोध 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

मलेरिया हा डासांमार्फत पसरवला जाणारा गंभीर आजार आहे. ज्यामुळे जगभरात सुमारे जवळपास ४ लाख जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारताचा विचार करता वर्षी सुमारे १३ लाख लोक मलेरिया मुळे आजारी पडतात. मलेरियाचे जंतू   (Plasmodium  परजीवी) हे मनुष्यातील रोगप्रतिकारक पेशींच्या तुलनेत त्वचेमधून दहा पटीने गतिमान असतात. मलेरिया जिवाणूंच्या गतिशील असण्यामागे  एक्टिन प्रथिनांची महत्वपूर्ण भूमिका असते. असा शोधनिबंध नागपूरच्या प्रज्वल नांदेकर यांनी सादर केला आहे. नवीन औषधाच्या निर्मितीकरिता हा शोध निबंध महत्वाचा ठरू शकतो.
[amazon_link asins=’B00URH5E34′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d89b06c-97f4-11e8-9567-6d2e49fd95ed’]

जर्मनी येथील हायडेलबर्ग विद्यापीठ हॉस्पिटल, हायडेलबर्ग विद्यापीठ (ZMBH) येथील सेंटर फॉर मॉलेक्युलर बायोलॉजी आणि द हायडेलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थिऑटिकल स्टडीज (HITS) च्या  संयुक्त विद्यमाने मलेरियाच्या जिवाणूंसंदर्भात महत्वपूर्ण शोधनिबंध सादर केला आहे. मलेरिया जिवाणूंच्या गतिशील असण्यामागे  एक्टिन प्रथिनांची महत्वपूर्ण भूमिका असते. असे यात सिद्ध करण्यात आले आहे. या निबंधाचा आंतरराष्ट्रीय ख्याती च्या विज्ञान शोधपत्रिकेत समावेश झाला आहे. या संशोधनात मूळच्या महाराष्ट्रातील नागपूर इथल्या  असलेल्या वैज्ञानिक डॉ. प्रज्वल नांदेकर यांनी हा शोध निबंध सादर केला आहे. ते मूळचे नागपूर येथील काटोल तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे जर्मनी येथील डॉ. रॉस डग्लस आणि इतर अंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी मोलाची मदत केली. डॉ. प्रज्वल नांदेकर हे सध्या हायडेलबर्ग विद्यापीठात संशोदक म्हणून कार्यरत आहेत आणि ते संगणकाच्या मदतीने औषधीनिर्माण ह्या विषयात विशारद आहेत.

प्राथमिक पेशीकंकाल प्रथिने परजीवींमध्ये आणि मानवांमध्ये वेगळी असतात आणि हेच मलेरिया संक्रमणाच्या विरुद्ध  उपचार आणि नवीन औषधी संशोधनाचा प्रारंभ बिंदू असू शकतो. मलेरिया जीवाणूंच्या हालचालींचा वेग आणि ताकद मानवी रोगप्रतिकारक पेशींच्या तुलनेत दहा पट अधिक असते. ह्या कारणामुळे मानवी रोगप्रतिकारक पेशींसाठी त्या वेगवान मलेरिया जीवाणूंना पकडणे आणि नष्ट करणे अतिशय कठीण जाते. डॉ. प्रज्वल नांदेकर आणि हायडल्बर्गच्या शास्त्रज्ञांनी आता मलेरियाचे हे जीवाणूं आपल्या पेशी पेक्षा जास्त जलद का आहे हे शोधले आहे. त्यांनी एक्टिन प्रथिनांचा अभ्यास करून हे सिद्ध केले आहे. डॉ. प्रज्वल नांदेकर सांगतात, “पेशीची संरचना आणि त्यांच्या हालचालींसाठी महत्वाची प्रथिने आणि ते परजीवी आणि मानवांमध्ये भिन्न रूपाने तयार केली गेलेली असतात. ह्या निष्कर्षयामुळे सर्व जिवंत पेशींच्या मुख्य घटकाबद्दलची आपली वैज्ञानिक समज बदलत आहे. आणि ह्याच माहितीच्या आधारे औषधनिर्माणशास्त्र संशोधकांना मलेरिया साठी नवीन औषध शोधण्यात मदत होईल.”
[amazon_link asins=’B07BR55J6B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90a7079d-97f4-11e8-a68f-03ed00c993a7′]

हा संयुक्त संशोधन प्रकल्प आंशिकरित्या हेईडेलबर्ग विद्यापीठातील संशोधन नूतनीकरण निधीद्वारे मंजूर करण्यात आला. या संशाेधन साठी डॉ. प्रज्वल आपल्या इतर सहकाऱ्यांचे आणि हेईडेलबर्ग विद्यापीठातील रिसर्च ग्रुपच्या प्रमुख प्राध्यापीका डॉ. रेबेका वेड, प्रमुख प्राध्यापक डॉ. फ़्रिएड्रीच, आणि डॉ. रॉस डग्लस, यांचे आभार मानतात. डॉ. प्रज्वल नांदेकर या उप्लबधीचे श्रेय त्यांचे आई आणि वडील, श्री व श्रीमती आशाताई प्रभाकरराव नांदेकर, त्यांची पत्नी श्रीमती श्रद्धा नांदेकर, बंधू हितेंद्र आणि उज्वल नांदेकर, इतर आप्तेष्ट, त्यांचे आज पर्यंतचे सर्व शिक्षक गण आणि सगळ्या मित्रांना देतात.