प्रकाश आंबेडकर यांचा दावा – बिहारमध्ये त्यांच्या आघाडीला मिळणार 20 ते 22 जागा, कुणालाही बहुमत नाही

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभेच्या 243 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येण्याची प्रतिक्षा आहे. एग्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या सरकारचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की, राज्यातील 20 ते 22 जागांवर त्यांच्या फ्रंटच्या उमेदवारांना विजय मिळत आहे.

बिहार निवडणूक 2020 बाबत प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटला बिहार निवडणुकीत 20 ते 22 जागांवर विजय मिळण्याचा स्पष्ट कल आहे. बिहारमध्ये कोणत्याही एक पक्षाला एकहाती सत्ता मिळणार नाही.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, बिहार निवडणुकीत यावेळी धार्मिक घुसखोरीऐवजी, विकास आणि रोजगारचा मुद्दा प्रमुख होता. बिहारच्या जनतेचे आता निवडणुकीतील खोट्या आश्वासनांनी पोट भरले आहे. आता राजकीय वक्तव्यांवर तेथील लोक विश्वास ठेवत नाहीत. याच कारणामुळे यावेळी बिहार विधानसभा निवडणूक पूर्णपणे विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर झाली.