‘दंगल घडवण्याचा डाव आम्ही सत्ताधार्‍यांसोबत बसून उधळला’, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्याने काही लोकांनी राजकीय दंगल घडवली होती. सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. हा डाव आम्ही सत्ताधार्‍यांसोबत बसून उधळून लावला, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असे आवाहन केले.

कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज मोठी गर्दी उसळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विजयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी आंबेडकर यांनी वरील गौप्यस्फोट केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नववर्षात सरकार महिलांची सुरक्षितता, रोजगार आणि शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असेल.

कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने कडेकोट नियोजन केले आहे. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. तसेच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मागील अनुभव पाहता सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच लोणीकंद शिक्रापूर परिसरातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कोरेगावा भीमा येते मंत्री नितिन राऊत आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील येणार असल्याचे सांगण्यात आले.

या सोहळ्यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून 740 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सोशल मीडियावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावरून जातीय भावना दुखावणार्‍या आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांनी 250 हून अधिक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला यापूर्वीच नोटिस पाठविली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?